Bhor Assembly Election 2024 | महायुतीने उमेदवार शंकर मांडेकर यांचा घाणाघात; म्हणाले – ‘गुंजवणी धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न 25 वर्षे का रेंगाळला? पुनवर्सित वसाहती दुर्लक्षित, सुविधा देण्यात आमदार अपयशी’

Shankar Mandekar

पुणे : Bhor Assembly Election 2024 | गुंजवणी धरणाला (Gunjavani Dam) विरोध कोणी केला ? धरणांच्या भूसंपादन व कामांत कोणी मलई खाल्ली, धरणग्रस्तांचे पुनर्वसन २५ वर्षात का झाले नाही याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, असा घाणाघाती हल्ला महायुतीने उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी आज केला.

गुंजवणी धरण परिसरातील कानंद, निवी, घेवंडीतील धरणग्रस्तांनी मांडेकर यांची भेट घेतली. त्यावेळी मांडेकर यांनी, आपण तुमची साथ देऊन समस्या सोडवू असे त्यांना आश्वस्थ केले. वेल्हा तालुक्यात १९९८ साली गुंजवणी धरणाच्या कामाला सुरूवात झाली. पण धरणाच्या पायाभरणीची थाळी एका माजी आमदाराने उधळली. हे धरण होऊ नये व वेल्ह्यातील जनता दरिद्री रहावी असेच काहींचे वर्तन होते. पण हा विरोध मोडून कृष्णा खोरे महामंडळांतर्गत धरण उभारणीचे काम सुरू झाले. या धरणाच्या भूसंपादन व धरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला. कमाल म्हणजे डोंगरावर ऊस शेती दाखवून भूसंपादनाचे कोट्यवधी रुपये काही मंडळींनी लाटले, त्याची सीआयडी चौकशी लावली गेली, पण ती का व कोणी थांबवली याची चौकशी गरजेची आहे, असेही मांडेकर म्हणाले.

धरणाचे काम पूर्ण झाले असताना अनेक कुटुंबांचे पुनर्वसन झालेले नाही.
धरणग्रस्तांसाठी बांधलेल्या वसाहतीत असुविधांचा डोंगर आहे. भूसंपादनाचे शेरेही अजून निघालेले नाहीत.
गेली २५ वर्षे या धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडले आहे, असेही ते म्हणाले. (Bhor Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed