Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत किंगमेकर कोण ठरणार? शिवसेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच, 23 नोव्हेंबरकडे सर्वांच्या नजरा

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (MVA Vs Mahayuti) नेत्यांचा धडाकेबाज प्रचार सुरू आहे. एकीकडे आघाडीत काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena Thackeray Group) फार सख्य असल्याचे दिसत नाही. तर दुसरीकडे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar NCP) आणि शिंदेंच्या शिवसेनेतही (Shivsena Shinde Group) तेच चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री त्यांचाच होणार, असं दिसतंय. तसे संकेतही अमित शहांनी दिले आहेत.

मात्र शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतील?, यावर दोन्ही पक्षांचे राजकीय वजन ठरणार आहे. त्यामुळे किंगमेकर व्हायचं तर आपापल्या पक्षाचं वजन शिंदे आणि अजित पवारांना वाढवावं लागणार आहे.

त्यामुळे मविआपेक्षा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी खरी स्पर्धा आहे. त्यामुळे मोठा भाऊ असलेल्या भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार यासाठी दोघांमध्ये जोरदार चुरस असणार आहे.

विधानसभा निवडणूक घोषित झाल्यावर शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षातील घडामोडीही तशाच पाहायला मिळाल्या. त्यामध्ये शिंदेंच्या अनेक इच्छुकांकडून राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी झालेली आहे. शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडून अजित पवारांवर वारंवार टीका करण्यात आली. तसेच हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर अजित पवारांच्या नेत्यांकडून शिंदेंवर निशाणा साधण्यात आला.

२३ नोव्हेंबरला भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री भाजपचा होणार यात शंका नाही.
खरी रस्सीखेच शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात होणार आहे.
त्यामुळे दोघांच्या रस्सीखेचीमध्ये भाजप घवघवीत यश मिळवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
त्यामुळे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीत किंगमेकर कोण ठरणार? यावर त्या पक्षाचं भवितव्य ठरणार आहे.
(Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed