Pimpri Chinchwad Crime Branch | तडीपार व वाँटेड आरोपीचा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा कट पोलिसांनी उधळला ! चौघांना अटक, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाची कामगिरी
पुणे : Pimpri Chinchwad Crime Branch | आळंदी ते मोशी रोडवरील (Alandi Moshi Road) पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने (Robbery On Petrol Pump) तडीपार व इतर गुन्ह्यांमध्ये वाँटेड (Wanted Criminal) असलेल्या आरोपींनी आखला होता. परंतु, त्याअगोदरच पोलिसांनी त्यांच्यावर धाड टाकून टोळक्यांपैकी तिघांना अटक केली. अंधाराचा फायदा घेऊन तिघे पळून गेले.
https://www.instagram.com/reel/DCL6kr3JFSF/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अर्जुनसिंग सुरजितसिंग भादा (वय २२, रा. शिवकॉलनी, आदर्शनगर, दिघी), सोहेल अलिशेर मिर्झा (वय २२, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी), रोमन दस्तगीर मुल्ला (वय २०, रा. चौधरी पार्क, दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (रा. दिघी), आकाश सुधीर साळवी (रा. दिघी), चेतन ऊर्फ चेप्या पांचाळ (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. त्यांचा शोध घेतला असता आकाश सुधीर साळवी (वय २२, रा. प्रेमसुंदर निवास, दिघी) हा मिळून आला. आरोपींकडून २ कोयते, १ पालघन, १ लायटर पिस्टल, नायलॉन दोरी, मिर्ची पावडर, ६ मोबाईल, २ मोटारसायकल व एक स्कु ड्रायव्हर असा २ लाख ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने तडीपार आरोपी चेक करीत असताना खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे व सहकारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी हवालदार प्रदीप पोटे व किरण जाधव यांनी बातमी मिळाली की, दिघीतील आदर्शनगर येथे काही जण शिव कॉलनीच्या बाजूला थांबले असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस पथक तेथे गेले. त्यांनी सर्वांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यात अंधाराचा फायदा घेऊन तिघे पळून गेले. पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर आळंदी ते मोशी रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याकरीता ते एकत्र जमले होते.
आरोपींवर दरोडा, दरोड्याची तयारी, खुनांचा प्रयत्न,जबरी चोरी, वाहन चोरी, दहशत माजविणे, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, घरफोडी, अंमली पदार्थ विक्री करणे, वाहनांची तोडफोड करणे असे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी सोहेल मिर्झा व रोमन मुल्ला हे तडीपार असून अर्जुनसिंग भादा हा २ गुन्ह्यात वाँटेड होता. तसेच आकाश साळवी एका गुन्ह्यात वाँटेड होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Sr PI Devendra Chavan), पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, किरण जाधव , प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, किरण काटकर, मंगेश जाधव, सुनिल कानगुडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)