Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा: सुनील टिंगरेंच्या प्रचार फेरीस उदंड प्रतिसाद; म्हणाले – ‘आगामी काळात वडगावशेरीचा कायापालट होईल’

Sunil Tingre

पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | यंदा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत याठिकाणी होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान मतदारसंघात त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

सुनील टिंगरे यांनी मतदारसंघातील फुलेनगर, आंबेडकर सोसायटी, इंदिरानगर, कळस- माळवाडी, म्हस्केवस्ती अशा विविध ठिकाणी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी घटकपक्षांचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. सुनील टिंगरे म्हणाले, “मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. पुढील कार्यकाळात ही विकासकामे पूर्ण होऊन या भागाचा कायापालट होईल”, असे टिंगरे यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed