Sharad Pawar News | ‘मी काय म्हातारा झालोय का?’, शरद पवारांची जोरदार फटकेबाजी; म्हणाले – ‘हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही’

sharad pawar

धाराधिव: Sharad Pawar News | परांडा विधानसभा मतदारसंघाचे (Paranda Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate) राहुल मोटे (Rahul Mote) यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, शांत बसणार नाही”, असे भाष्य शरद पवार यांनी केले आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), रणजित पाटील (Ranjit Patil) उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ” ओमराजे मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं. आता एक म्हातारा खांद्यावर बसून आलेला पाहिला का? असेही पवार म्हणाले.

“विरोधकांनी संविधान बदलण्यासाठी ४०० पार ची घोषणा केली. मात्र तुम्ही लोकांनी निर्णय हाती घेतला. तुम्ही आम्ही एकत्र झालो आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी ३१ खासदार तुम्ही निवडून दिले आणि घटना वाचवायचं काम केलं. ही विधानसभा तुमच्या विचाराच्या लोकांच्या हातात पाहिजे. सत्ता हातात आल्यावर लोकांचे प्रश्न सोडवता येतात.”

ते पुढे म्हणाले, “दुष्काळाला तोंड देणारा, रोजगार हमीच्या कामावर जाणारा तुमच्यासारखा शेतकरी ऊस उत्पादन करतोय. माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्या घरातील मुले उच्च शिक्षित झाली पाहिजेत. त्यासाठी आम्ही काम हातात घेतलं आहे. महाविकास आघाडीचे संघटन उभं केल आहे. महिलांना अधिकार दिले की महिला काहीही करू शकतात. महिलांना संधी देण्यासाठी महालक्ष्मी योजना काढल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed