Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण? भाजपच्या चुप्पीमुळे संभ्रम अधिकच वाढला

Vijay-Shivtare-Ajit-Pawar

पुरंदर: Purandar Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे त्यामुळे प्रचारासाठी कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी पक्षात (NCP) बंड झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. यंदा महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) प्रामुख्याने महत्वाच्या लढती होतील अशी चर्चा आहे.

दरम्यान पुरंदर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shivsena Shinde Group) माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) कडून संभाजीराव झेंडे (Sambhaji Zende) मैदानात आहेत. दोन्ही बाजूने आपणच महायुतीचा अधिकृत उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यातील नेमका अधिकृत उमेदवार कोण? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज भोर (Bhor Assembly Election 2024) आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार दौऱ्यावर आहेत. महायुती आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे भोर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार घोटावडे मुळशी येथे प्रचार सभा घेणार आहेत.

शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्यासोबतच शिवसेनेचे बंडखोर कुलदीप कोंडे (Kuldeep Konde) आणि भाजपचे बंडखोर किरण दगडे पाटील (Kiran Dagade Patil) यांच आव्हान आहे. त्यामुळे या बंडखोरी बाबत अजित पवार काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

त्यानंतर अजित पवार पुरंदर विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत. मतदारसंघांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांनी संभाजीराव झेंडे यांना मैदानात उतरवले आहे.

संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारासाठी आज अजित पवार भेकराईनगर आणि उरुळी देवाची या दोन ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. प्रचार सभेच्या कार्यक्रमांमध्ये संभाजीराव झेंडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा उल्लेख केला आहे.

तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले विजय शिवतारे देखील आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत प्रचार करत आहेत. यामुळे मतदारांमध्ये नेमकं महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे.

या मतदारसंघांमध्ये भाजपची नेमकी भूमिका काय? असणार आणि भाजपचा पाठिंबा हा शिंदेंच्या उमेदवारांना असणार की अजित पवारांच्या? याबाबत देखील वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपच्या या चुप्पीमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed