Bibvewadi Pune Crime News | कॉलेज कट्ट्यावरुन लॅपटॉप चोरुन नेणारे चोरटे जेरबंद ! बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
पुणे : Bibvewadi Pune Crime News | कॉलेजच्या कट्ट्यावरुन लॅपटॉपची बॅग चोरुन नेणाऱ्या चोरट्यास पकडण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. प्रितम तुषार भामरे (वय २१, रा. सिमासागर सोसायटी, सुखसागरनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ८२ हजार रुपयांचे दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. (Arrest In Laptop Theft Case)
फिर्यादी व त्यांचा मित्र यांनी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास व्ही आय टी कॉलेज येथील कट्यावर लॅपटॉप असलेली बॅग ठेवली होती. त्यांच्या नकळत चोरट्याने दोन्ही लॅपटॉप चोरुन नेले होते. पोलिसांनी या ठिकाणाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींचे मोडस वरुन पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, संजय गायकवाड, शिवाजी येवले व सुमित ताकपिरे यांना त्यांच्या बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रितम भामरे याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लॅपटॉप जप्त करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, शिवाजी येवले,सुमित ताकपेरे, विशाल जाधव ज्योतिष काळे, प्रणय पाटील, अभिषेक धुमाळ यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची
भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)