Kothrud Assembly Election 2024 | कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार; महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद (Video)

Chandrakant Patil

सोसायटीचे ज्येष्ठ नागरीक आणि गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार स्वागत

पुणे : Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंदाही गुलाल उधळण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या रॅली मध्ये असंख्य तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांकडून भव्य स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

https://www.instagram.com/p/DCQnlW3Jxq8

विधानसभा निवडणुकीला चांगलाच रंग चढत आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी, रोड शो, पदयात्रा यामुळे सगळीकडे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील प्रचारात अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटींसह बाईक रॅलीद्वारे रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. या सर्व उपक्रमांना कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सोमवारी संध्याकाळी कोथरुड मधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वनाझ येथील किनारा हॉटेल चौकातून रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा निनाद , पुष्पवृष्टीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करुन चंद्रकांतदादा पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दिव्यांग बांधवांकडूनही चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष दिपकभाऊ मानकर, हर्षवर्धन मानकर,
करण मानकर, रिपाइंचे ॲड मंदार जोशी, बाळासाहेब खंकाळ, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी,
भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे,
भाजपाचे प्रभाग ११ चे अध्यक्ष आशुतोष वैशंपायन, अभिजीत राऊत, स्वाती मोहोळ, सुरेखा जगताप, दिनेश माझिरे,
दत्ताभाऊ भगत, नाना कुंबरे, दिलीप उंबरकर यांच्या सह भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kothrud Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed