Pune Crime News | चांदणी लॉन्सला विनापरवाना सभा घेणार्‍या सचिन दोडके यांच्या कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

NCP Sachin Dodke

पुणे : Pune Crime News | परवानगी न घेता स्टेज उभारुन सभा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार सचिन दोडके (Sachin Dodke) यांच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

रोहन ज्ञानोबा धावडे, संजय (बाबु) दोडके आणि अजयभाऊ पोळ (सर्व रा. वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भरारी पथकाचे प्रमुख राहुल सर्जेराव साळुंखे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार चांदणी चौकातील चांदणी लॉन्स येथे १० नोव्हेबर रोजी रात्री ८ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन शिवाजीराव दोडके हे खडकवासल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहे. रोहन धावडे याने चांदणी लॉन्स येथे विना परवाना स्टेज, साऊंड, खुर्च्या, बॅनर, स्नेहभोजन कार्यक्रमाची व्यवस्था करुन लोकांची जमावा जमव करुन सभा घेतली. या कार्यक्रमाला येण्यासाठी संजय दोडके याने व्हॉटसअपद्वारे जाहिराती प्रसिद्धी करुन नागरिकांना आवाहन केले. तसेच वारजेकरांचा निर्धार सचिनभाऊ दोडकेच आमदार अशा आशयाचा बॅनर कार्यक्रम ठिकाणी शुभेच्छुक म्हणून अजयभाऊ पोळ यांनी लावला. तिघांनी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी तपास करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”,
सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed