Kasba Peth Assembly Election 2024 | कसबा मतदारसंघातील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; रविंद्र धंगेकर म्हणाले – ‘सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद पाहता, मायबाप जनता पुन्हा जनसेवेची संधी देणार’

Ravindra Dhangekar

पुणे : Kasba Peth Assembly Election 2024 | कसबा विधानसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिलेला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), महायुतीकडून हेमंत रासने (Hemant Rasane) आणि मनसेकडून गणेश भोकरे (Ganesh Bhokre) अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळत आहे. तिन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त महाविकास आघाडीचे व इंडिया फ्रंटचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांची कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १७ रविवार पेठ, रास्ता पेठ येथे नुकतीच पद यात्रा पार पडली. या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी औक्षण करत धंगेकर यांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद पाहता, मायबाप जनता पुन्हा जनसेवेची संधी देणार हे नक्की. कोणत्या चेहऱ्याला मतदान करायचे हे जनतेला चांगलं माहिती आहे. त्यामुळं विजय आपलाच होईल, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला. (Kasba Peth Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”,
सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed