Sahakar Nagar Pune Crime News | पतीपत्नीच्या भांडणात मेव्हणा, चुलतसासरा, सासुची एंट्री; जावयाला मारहाण करुन पत्नी व मुलास घेऊन गेले
पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | पतीपत्नीच्या भांडणात कोणी नाक खुपसु नये, असे म्हणतात. पण, पत्नीनेच जर त्याची तक्रार माहेरी केली तर. माहेरकडील मंडळीने मुलीच्या सासरी येऊन जावयाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी दत्तात्रय विजय भडकवाड (वय ३१, रा. संभाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित विजय पारधे (वय २९), रोशनी दत्तात्रय भडकवाड (वय २१), रेश्मा विजय पारधे (वय ५०) आणि बाळु दासु पारधे (वय ४०, सर्व रा. वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील संभाजीनगर येथे फिर्यादीच्या घरी सोमवारी मध्यरात्री २ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी रोशनी हिने घरगुती कारणावरुन फिर्यादींशी वाद घातला.
त्यानंतर तिने आई, चुलता व भावास बोलावून घेतले. ते जावयाच्या घरी आले.
त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन हातानी मारहाण केली.
फिर्यादीचा मेव्हणा रोहित पारधे याने त्यांच्या घरात असलेला लाकडी दांडका घेऊन फिर्यादीच्या हाताच्या मनगटावर मारुन फिर्यादीला जखमी केले.
फिर्यादीची पत्नी व मुलाला घेऊन गेले. पोलीस हवालदार मानसिंग जाधव तपास करीत आहेत. (Sahakar Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ