Yeola Assembly Election 2024 | येवला मतदारसंघातून शरद पवारांचा भुजबळांवर घणाघात; म्हणाले – ‘भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत, त्यांच्या उद्योगाचा परिणाम सरकारवर झाला’
नाशिक: Yeola Assembly Election 2024 | येवला विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी छगन भुजबळ आणि अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आजची सभा ऐतिहासिक सभा आहे, माणिकराव शिंदें यांनी लोकांची सेवा केली आहे. मागे मी आलो असता, मी जाहीर सांगितले होते की आमच्याकडून चूक झाली असे म्हणत शरद पवारांनी येवलेकरांना साद घातली. (Sharad Pawar On Chhagan Bhujbal)
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा, विधानपरिषदेत संधी दिली, विरोधी पक्षनेते पद दिले. पण, त्यांनी काही उद्योग केले, त्यांना पद सोडवं लागलं, तुरुंगात गेले, त्यांना भेटायला कोणी जात नव्हते. माझी मुलगी, आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्यांना पुन्हा संधी दिली, तुम्ही त्यांना निवडून दिले.
मुंबईतील शिवाजी पार्कवर संमेलन घेतले होते, त्याचे अध्यक्षपद भुजबळ यांना दिले. उपमुख्यमंत्री पद दिले, त्यानंतर ते आणखी उद्योग करत होते, त्याचा परिणाम सरकारवर झाल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ” आमच्या सहकाऱ्याने पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का असं मला विचारलं. भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाही, आणि दुसऱ्या दिवशी शपथच घेतली.
एखाद्या माणसानं चुकीचे काम करताना काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. ही लढाई आपण प्रचंड मतांनी जिंकू”, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’
Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ