Hadapsar Assembly Election 2024 | जाती-धर्मात फूट पडणाऱ्या भाजपाला घरी बसवा; खासदार इम्रान प्रतापगढी यांचा हल्लाबोल; प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ कोंढव्यात सभा

Prashant Jagtap

कोंढवा: Hadapsar Assembly Election 2024 | “ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नाही, तर जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात आहे. द्वेष विरुद्ध प्रेम अशी ही लढाई आहे. त्यांचा नारा ‘बटेंगे तो कटेंगे’ आहे, तर आपला नारा ‘नफरत की बाजार मी मोहब्बत की दुकान’ असा आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या, महाराष्ट्राला लुटणाऱ्या भाजप व महायुतीला घरी बसवा,” असा हल्लाबोल काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांनी चढवला.

हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप (Prashant Jagtap) यांच्या प्रचारार्थ कोंढव्यात आयोजित जाहीर सभेत खासदार इम्रान प्रतापगढी बोलत होते. खासदार मोहम्मद फैजल, उमेदवार प्रशांत जगताप, अजमेर शरीफ दर्गा कमिटीचे चेअरमन अमीन पठाण यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कोंढवा भागातील पदाधिकारी उपस्थित होते. कोंढव्यातील या सभेने निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आक्रमक प्रचारामुळे हडपसर मतदारसंघात प्रचंड ऊर्जा दिसून येत आहे. प्रशांत जगताप यांनी आपल्या प्रभागाच्या विकासाची हमी देत जनतेचा विश्वास संपादन केला आहे, तर इम्रान प्रतापगढी यांच्या जोरदार टीकेमुळे भाजपवरील दबाव वाढत आहे.

इम्रान प्रतापगढी म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून भाजपाने देशात जातीवाद पसरवून हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातच्या रिमोट कंट्रोलवर महाराष्ट्र चालवण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात भाजपने फोडाफोडी केली, चिन्हे पळवली, पक्ष पळवला. मात्र, तुम्ही घडी चोरली, तरी वेळ कशी चोरणार? केंद्रातही दोन कुबड्यांवर आधारित सरकार आहे. भारताचे संविधान, महाराष्ट्राची अस्मिता  वाचवण्याची ही लढाई आहे. गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या नितेश राणे यांच्यासारख्या वाचाळवीरांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या प्रशांत जगताप यांना निवडून द्यावे.”

प्रशांत जगताप यांनी हडपसरच्या विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली. ‘हडपसर हे पुण्याचे सांस्कृतिक माहेरघर आहे, परंतु भाजप आणि त्यांचे लोक या सांस्कृतिक वारशाला तडा देण्याचे काम करत आहेत. ‘लाडकी बहीण-लाडका भाऊ’ यांसारख्या योजनांतून भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. त्यापासून जनतेने सावध राहून महाविकास आघाडीला निवडून द्यावे.

शरद पवार यांची हडपसरमध्ये सभा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या परिवर्तन निर्धार सभेचे हडपसरमध्ये आयोजन केले आहे. हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ ही सभा उद्या गुरुवारी सायंकाळी ७ वाजता स्वर्गीय विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृहासमोर, माळवाडी, हडपसर पुणे येथे होणार आहे. ‘साहेब येत आहेत, निष्ठावंत कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि परिवर्तन घडविण्यासाठी’ असा नारा देत या सभेची माहिती मतदारसंघात लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. हडपसरचा विकास, रखडलेली कामे, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी, कचरा प्रश्न, पाणीटंचाई अशा विविध प्रश्नावर शरद पवार काय बोलणार? याकडे हडपसरवासियांचे लक्ष लागले आहे. प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली असून, पवार यांच्या सभेने प्रशांत जगताप यांना लाभ होणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

You may have missed