Helmet Compulsory For PMC Employee | महापालिका भवन आणि महापालिकेच्या सर्व इमारतींमध्ये दुचाकीवर येणार्या अधिकारी व कर्मचार्यांना आजपासून ‘हेल्मेट सक्ती’
पुणे : Helmet Compulsory For PMC Employee | पुणे महापालिकेच्या दुचाकीचा वापर करणार्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांना ‘हेल्मेट’ वापर सक्तीचा करण्यात आला आहे. हेल्मेट परिधान न करता महापालिका भवन, क्षेत्रिय कार्यालय आणि महापालिकेच्या इमारतींच्या आवारात येणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या दुचाकींना प्रवेश किंवा पार्किंगसाठी परवानगी देउ नये असा आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सुरक्षा विभागाला दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून सेवापुस्तकातही त्याची नोंद घेण्यात येणार असल्याचा इशारा या आदेशात देण्यात आला आहे.
मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकी चालक आणि पाठीमागे बसणार्या सहप्रवाशाला हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे. मागील महिन्यांत दुचाकी चालकांचे प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये सर्वप्रथम शासकिय व निमशासकीय कार्यालयात दुचाकीवर येणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने ऑक्टोबरमध्ये तसे आदेश देखिल काढले आहेत. या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने देखिल महापालिका भवन व महापालिकेच्या शहरातील अन्य कार्यालय व इमारतींच्या आवारात दुचाकीवर येणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी हेल्मेटचा वापर बंधनकारक असेल, असे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सुरक्षा विभागाला दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास शिस्तभंग म्हणून संबधित अधिकारी आणि कर्मचार्याच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचेही अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अपघातांची मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेटचा वापर आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची सुरूवात महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी स्वत:पासून करावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार महापालिका ही अंमलबजावणी करत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Chhagan Bhujbal | शिवसेना फोडल्याच्या छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की…’
Pune Cantonment Assembly Election 2024 | प्रभाग 20 मध्ये महायुतीचे सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)