Sharad Pawar NCP | ‘उभं करायला अक्कल लागते, उध्वस्त करायला नाही’, शरद पवारांची फटकेबाजी; म्हणाले – ‘मला चिंता वाटते की…’

Sharad Pawar

अहिल्यानगर : Sharad Pawar NCP | शिर्डी विधानसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्यात लढत होत आहे. दरम्यान काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची (दि.१३) सभा पार पडली.

यावेळी पवारांनी विखे पाटलांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत टीकास्त्र सोडले. शिर्डी मतदार संघात दहशत माजवली जात आहे. लोकशाहीमध्ये असं जर कोणी करत असेल तर त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराच शरद पवार यांनी दिला आहे. उद्धवस्त करण्यासाठी अक्कल लागत नाही, काही उभं करायचं असेल तर अक्कल लागते”, असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवार म्हणाले, ” मला या भागाची मला चिंता वाटते. पुर्वी याठिकाणी पेरूच्या मोठ्या प्रमाणात बागा होत्या. मात्र आता हे क्षेत्र घटलं आहे. पाणी कमी असल्याचं कारण सांगितलं जातं. असं असेल तर इथला आमदार कोण आहे? त्यांना तुम्ही अनेक वेळा निवडून दिलं. अनेक वेळा ते मंत्री ही होते.

सर्व साधन सामुग्री आणि यंत्रणा ही त्यांच्या हाताखाली होती. पण या नेतृत्वाला सामान्य माणसाची चिंता नाही. पाणी साठी दोनशे कोटी आल्याचे सांगत होते. पण ते गेले कुठे? मोठे आकडे सांगायचे आणि लोकांना भुलवायचं हा दृष्टीकोन इथल्या नेतृत्वाचा आहे”, अशी टीका शरद पवार यांनी केली.

ते पुढे म्हणाले, ” इथले आमदार आज ज्या पक्षात आहेत तो पक्ष त्यांचा आहे का? ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी सत्तेसाठी वाट्टेल ती तडजोड केली. वाट्टेल त्या गोष्टी केल्या. अशा लोकांकडून विकास कधीच होणार नाही.

नगर जिल्ह्यातील काही लोक मला भेटले होते. त्यांनी याठिकाणी प्रचंड दहशत आणि दडपशाही असल्याचे सांगितले.
काही करून ही दडपशाही बंद करा. ही लोकशाही आहे,
लोकशाही मध्ये जर कोणी दहशत आणि दडपशाही वापरत असेल तर ती उद्धवस्त करण्याची ताकद तुमच्यात आहे.

काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांना विजयी करण्याचे आवाहन करत शरद पवार म्हणाले,
प्रभावती या माझ्या मुलीसारख्या आहेत. शिवाय ज्या घरातल्या त्या सुनबाई आहेत त्या घराबरोबरही माझे जवळचे संबध आहेत.
त्यामुळे मी सांगितल्यावर तुम्ही त्यांना मतदार करणार ना? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed