Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’, ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
बारामती: Maharashtra Assembly Election 2024 | बारामती येथील ‘निर्भय बनो’ च्या सभेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते, ऍड.असिम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठा फायदा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी जरांगे पाटलांचा मोठा हातभार राहणार आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितल्यानंतर मी जरांगेंशी बोललो, माझे भाग्य त्यांनी आपलं ऐकलं आणि निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला”, असे ऍड. असीम सरोदे यांनी म्हंटले आहे.
ऍड. असीम सरोदे म्हणाले, ” शरद पवार माझ्या ऑफिसला आले होते, मी जरांगेबाबत त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मी उद्धव ठाकरेंनाही सांगितले तेही म्हणाले तुम्ही बोलून घ्या. आम्हाला वाटलं आम्ही लोकसभेला इतक्या सभा घेतल्या आणि विधानसभा निवडणुकीला हे काय सुरू झालं.
जर मराठा समाजाच्या नावाखाली इतके लोक उभे राहत असतील तर मतांच्या विभाजनाचा फायदा कोणाला होईल म्हणून मी जरांगे पाटलांकडे गेलो. त्यांच्याकडे खूप गर्दी होती. ते म्हणाले आपल्याला निवांत बोलायचं असेल तर या सर्वांना भेटून मी घालवतो, मग आपण बोलू. रात्री ११.३० वाजता आमची बैठक सुरू झाली. ३ वाजेपर्यंत विविध विषयांवर आमची चर्चा झाली”, असं ऍड. सरोदे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ” जरांगेंसोबतच्या बैठकीत मी त्यांना म्हटलं, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी तुम्ही लावून धरली ती अत्यंत महत्त्वाची सामाजिक आहे. तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून हीच भूमिका कायम ठेवा, जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावेत असं कुणाकुणाला वाटत होते, तर यादी काढा.
सगळ्यात पहिले देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती. दुसरे होते महाजन, तिसरे होते लक्ष्मण हाके अशा काही लोकांची यादी काढली तर त्यांना फायदा द्यायचा आहे म्हणून तुम्ही निवडणुकीला उभं राहिले पाहिजे असं वाटत होते. तुम्ही समाजात फूट पाडू नका याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. माझं भाग्य त्यांनी ते ऐकले आणि आपण निवडणुकीत उभे राहणार नाही असा निर्णय घेतला”, असा दावा ऍड. असिम सरोदे यांनी केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा