FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल ! बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Pune PMC News | 16 corporators from 32 villages included in the Municipal Corporation! Corporators and political parties will have an opportunity to ensure balanced development of villages; Will 'villagers' get an opportunity in important positions?

पुणे : FIR On PMC Officers In Pune | बारावी नापास असताना सिक्कीम मणिपाल युनिव्हसिर्टीची ‘एमबीए’ची बनावट डिग्रीचे मार्कलिस्ट बनवून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करायला दिली. त्याला तत्कालीन शिक्षणाधिकारी व लिपिकांनी साथ दिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पुणे महानगर पालिकेचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर (Somnath Haribhau Bankar), तत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे (Sudhakar Tambe) आणि लिपिक राजेंद्र घारे (Rajendra Ghare) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोमनाथ बनकर हे सध्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुधीर रामचंद्र आल्हाट (वय ५४, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shiavji Nagar Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे महापालिका कार्यालय येथे १ जानेवारी २००८ ते जानेवारी २०१६ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असलेले सोमनाथ बनकर हे २००८ मध्ये पुणे महानगर पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलचे रेक्टर होते. त्यावेळी त्यांनी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीमधून २००८ व २००९ या शैक्षणिक वर्षांमध्ये एम बी ए (एच आर एम) ही बनावट डिग्री प्राप्त करुन त्यांच्या स्वत:च्या सेवा पुस्तिकेत नोंद करुन घेतली. त्यावर तत्कालिन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे यांची स्वाक्षरी आहे.

फिर्यादी यांनी या सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीमध्ये माहिती अधिकारात अर्ज केला होता. २७ डिसेंबर २०१६ रोजी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीने सोमनाथ बनकर या नावाच्या कोणत्याही विद्यार्थ्याकडून पदवी घेतली नसून ही पदवी बनावट असल्याचे सांगितले आहे. बनकर यांनी एम बी एची डिग्री बनावट असल्याचे सिद्ध होऊनही त्याची चौकशी महापालिकेने केली नाही. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तपास करुन सोमनाथ बनकर यांची एम बी एची डिग्री बोगस असल्याची खात्री करुनही गुन्हा दाखल न करता ४ मे २०२४ रोजी पुणे महापालिकेला गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २१ एप्रिल २०१८ रोजी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना गोपनीय अहवाल पाठविला असून त्यामुळे बनकर यांची पदवी बनावट असल्याचे म्हटले आहे.

आणखी पाच अधिकार्‍यांची डिग्रीविषयी संशय

महापालिकेच्या अधिकार्‍यांनी बनावट डिग्री घेतल्याचा संशय आहे. त्यांचीही चौकशी करुन बनावट डिग्रीचे रॅकेट शोधून काढावे, अशी मागणी सुधीर आल्हाट यांनी केली आहे. या अधिकार्‍यांची यादी त्यांनी पोलिसांना दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’, ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed