Brahmin Society On MVA Advt | मविआच्या जाहिरातीवर ब्राह्मण समाजाचा तीव्र आक्षेप; जाहिरातींवर त्वरित बंदी आणण्याची मागणी

sharad pawar-uddhav thackeray-nana patole

पुणे: Brahmin Society On MVA Advt | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रचाराची रणधुमाळी १८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. (Mahavikas Aghadi)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीने (Mahayuti) जाहिरातींचाही धडाका लावला आहे. महाविकास आघाडीच्या एका जाहिरातीमध्ये ‘अनाजी’ असा उल्लेख केल्याने ब्राह्मण समाजाने तीव्र संताप व्यक्त करत यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

या जाहिरातीमुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचे महासंघाने म्हंटले आहे. महाविकास आघाडीने (दि.१५) निवडणूक प्रचारासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पान जाहिरात प्रसिद्ध केली. ‘पहिल्या अनाजीने स्वराज्याला लुटले आणि दुसऱ्याने अवघ्या महाराष्ट्राचे व शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त केले’ असा उल्लेख या जाहिरातीत आहे.

” अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने या जाहिरातीचा व महाविकास आघाडीचा तीव्र निषेध करतो. अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या जाहिरातींवर त्वरित बंदी आणावी व ही जाहिरात वृत्तपत्रांतून मागे घेण्यात यावी'”, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष मंदार रेडे यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar News | “….त्यावेळी शिवसेनेला भाजपापासून वेगळं करायचं होतं म्हणून चाचपणी”, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट


You may have missed