Vadgaon Sheri Assembly Election 2024 | बाईक रॅलीच्या माध्यमातून महिलांनी उठवला आवाज ! बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीमध्ये महिलांचा झंझावात

Bapu Pathare

जिजामाता उद्यानात जिजाऊंचा पुतळा उभारू – बापूसाहेब पठारे

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘जिजाऊंच्या लेकी आम्ही, जशा तळपती तलवारी, महाराष्ट्राच्या हितासाठी हाती घेतली तुतारी’… पंधराशेहून अधिक महिला वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या आणि मतदारसंघात झंझावात निर्माण झाला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला प्रदेश उपाध्यक्षा अश्विनी महांगडे उपस्थित होत्या. वडगावशेरी येथील राजमाता जिजाऊ ऑक्सीजन पार्क येथून जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. चंदननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी महिलांचा मोठा उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळाला. मतदारसंघातील महिलांच्या असलेल्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने, स्वच्छतागृहांचा अभाव, पथदिव्यांचा अभाव असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न, पाणी प्रश्न, सोसायटीपर्यंत विविध माध्यमातून शटल सेवा मिळावी यावर महिलांनी रॅलीच्या माध्यमातून आवाज उठवला.

जिजाऊंचा पुतळा बांधून वंदन करू: बापूसाहेब पठारे

बाईक रॅलीला शुभेच्छा देताना बापूसाहेब साठे म्हणाले,’टिंगरे यांच्या अहवालात जिजामाता उद्यान ऑक्सीजन पार्क मध्ये जिजामाता पुतळा आहे,असे लिहिले होते, मात्र आज कोणालाही हा पुतळा दिसला नाही. आम्हाला जिजाऊंचा फोटो ठेऊन वंदन करावे लागले, निवडून आल्यावर येथे जिजाऊंचा पुतळा उभारला जाईल.

मतदारसंघात गेल्या १० वर्षांत महिलांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी, सुरक्षेसाठी कोणतेही ठोस काम करण्यात आलेले नाही. महिला वर्गाच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षरश: दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात बचत गट उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी विमानतळावर जागा उपलब्ध करणे, विविध भागात स्वच्छतागृह उभारणे, महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिरांचे व विशेष प्रशिक्षण देणे ही महिलांच्या दृष्टीने महत्त्वाची कामे प्राधान्याने हाती घेणार असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी रॅलीच्या निमित्ताने सांगितले.

अश्विनी महांगडे यांनीही बापूसाहेब पठारे यांना निवडून देण्याचे आवाहन करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, हा विश्वास व्यक्त केला.

महिलांचा हा संदेश घरोघरी पोहोचला असून बापूसाहेब पठारे यांचा विजय निश्चित झाला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | महिला बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध प्रश्नांवर उठवला आवाज


You may have missed