Shrimant Bhausaheb Rangari Ganapati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व तुळशी विवाह संपन्न (Video)

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati

पंच पक्वांन्नाच्या नैवेद्याचे सामाजिक संस्थांना दान

पुणे : Shrimant Bhausaheb Rangari Ganapati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव, तुळशी विवाह आणि ५६ भोग चा नैवेद्य करण्यात आला. यावेळी विविध पंच पक्वान आणि फळाची आरास बाप्पा समोर साकारण्यात आली होती.

https://www.instagram.com/reel/DCcG8MHpyDV/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने नेहमी प्रमाणे सामाजिक भान राखून बाप्पाला दाखविण्यात येणाऱ्या नैवद्यातील सर्व मिठाई, फराळ आणि फळे सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दत्तवाडी येथील देवतारू आश्रम आणि मुळशी खोऱ्यातील कातकर वस्ती वरील ३०० विद्यार्थ्याना शिक्षण देणाऱ्या आणि दररोज ९० मुलांना जेवण पुरविणाऱ्या पौड येथील ‘डोनेट ऐड’ संस्था आणि भाजे येथील बालग्राम केंद्र यासर्वांना हे सर्व नैवेद्यचे पदार्थ देण्यात येणार आहे.

दिव्यांच्या सजावटीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे मंदिर उजळले

त्रिपुरारी पौर्णिमेंनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात दिवे लावून फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. काचेच्या ग्लासमधील दिव्यांनी संपूर्ण मंदीर उजळून निघाले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे सर्व पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed