Uddhav Thackeray On Mahayuti Leaders | उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांवर घणाघात; म्हणाले – “आमचं सरकार आलं तर तुम्हाला देखील जेलमध्ये टाकू”
नाशिक : Uddhav Thackeray On Mahayuti Leaders | नाशिकला महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभेत बोलताना शिवसेना उबाठाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “आमच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही खोट्या केस टाकत आहात, तडीपार करत आहात. मात्र आम्ही सूडबुद्धीनं वागलो तर तुमच्या दसपटीनं वागू. आमचं सरकार आलं तर तुम्हाला देखील जेलमध्ये टाकू,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात गुंडगिरी वाढत आहे. निवडणूक आयोग तुमचा नोकर आहे, मतांसाठी तुम्ही धर्मयुद्ध करा, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. लाडकी बहिणींना नुसते पैसे देऊन नाही चालणार, त्यांचं संरक्षण करणं देखील गरजेचं आहे. विरोधक आपला महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहण्यासाठी निघाले आहेत. त्यांना मतदान करू नका, मी माझ्यासाठी लढत नाही, महाराष्ट्रासाठी लढत आहे.
माझ्यासोबत जोपर्यंत तुम्ही आहे, तोपर्यंत मी संपणार नाही. आमच्या लोकांवर तुम्ही खोट्या केस टाकत आहात, तडीपार करत आहात. आम्ही सूडबुद्धीनं वागलो तर तुमच्या दसपटीनं वागू. आमचं सरकार आलं तर तुम्हाला देखील जेलमध्ये टाकू. पुढचं सरकार आमचं आहे, त्यामुळे पोलिसांनी देखील जनतेचं काम करावं,” असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला आहे.
“मला शक्य आहे तेच मी बोलेन, मी म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाही,
मी नाशिकला दत्तक घेणार अशी घोषणा करणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला वाऱ्यावर सोडून गद्दारांना डोक्यावर घेतलं”,
अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केली आहे. (Uddhav Thackeray On Mahayuti Leaders)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’