Dhayari Pune Crime News | धायरीत दोन गटात राडा ! कोयत्याने केले वार तर गाडी अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

marhan

पुणे : Dhayari Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन धायरीत दोन गटात राडा झाला. एका गटाने कोयत्याने वार (Koyta Attack) करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). तर दुसर्‍या गटाने दोघांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) दोन्ही गटातील ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबबात स्वप्नील संतोष खिरीड (वय २०, रा. लायगुडे वस्ती, अंबाईदरा, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश शिळीमकर, आदित्य म्हस्के आणि अथर्व दांडके यांना अटक केली असून अन्य तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता लायगुडे वस्तीत झाला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश शिळीमकर व त्याचे साथीदार फिर्यादीचे घराजवळ आले. स्वप्नील खिरीड कोठे आहे, असे स्वप्नीलच्या भावाला विचारले. त्याने बाहेरगावी गेला आहे, असे सांगितले. त्याचवेळी घराजवळ शेजारी उभा असलेल्या स्वप्नील खिरीड याला पाहून अविनाश शिळीमकर, कुणाल जाधव, अथर्व दोडके यांनी त्यांच्याकडील कोयते काढले. फिर्यादींच्या डोक्याच्या दिशेने उगारुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. एका महिलेला अमीत कदम कोठे आहे, असे विचारुन तो मिळाला की त्यास मारुन टाकणार अशी धमकी दिली. या घटनेत स्वप्नील खिरीड हे जखमी झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

त्याविरोधात अविनाश गोपाळ शिळीमकर (वय २२, रा. समर्थ कॉम्प्लेक्स, धायरेश्वर मंदिरामागे, पोकळे वस्ती) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमित कदम, ओंकार भोसले व तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पोकळे वस्तीत समर्थ कॉम्प्लेक्स येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली़

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्यांचे मित्र कुणाल जाधव, आदित्य मस्के, आदित्य काळे, अर्थव शिंदे हे समर्थ कॉम्प्लेक्स याइमारतीच्या खाली रोडवर गप्पा मारत थांबले होते.
यावेळी एका मोटारसायकलीवरुन तिघे जण तोंडाला रुमाल बांधून फिर्यादी यांच्या जवळून थोडे अंतर पुढे जाऊन थांबले.
फिर्यादी व आदित्य काळे हे त्यांच्याजवळ जाऊन कोण आहे,
कोणाकडे आलात, अशी विचारणा केली. त्यांनी काही उत्तर न देता, त्यांनी त्यांची गाडी जोरात पुढे पळवली.
फिर्यादी व आदित्य काळे हे त्यांच्या मागे पळत गेले.
त्याचवेळी त्यांच्या पाठीमागे एक स्वीफ्ट कार आली. त्यामध्ये अमित कदम व ओंकार भोसले होते.
त्यांनी जुन्या भांडण्याचा राग मनामध्ये धरुन फिर्यादी व आदित्य काळे
यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक दिली.
यावेळी फिर्यादी हे रस्त्याच्या उजव्या बाजुला पडले तर आदित्य काळे हा डाव्या बाजूला पडून दोघेही जखमी झाले.
पोलीस उपनिरीक्षक बुनगे तपास करीत आहेत. (Dhayari Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed