Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला रवींद्र धंगेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले – “त्यांनी माझी सर्व नाटकं बघितली त्यात…”
पुणे : Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Peth Assembly Election 2024) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या प्रचारासाठी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसबा मतदारसंघात सभा पार पडली.
या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका करताना, धंगेकर ‘ॲक्सिडेंटल आमदार’ असल्याचे म्हटले होते. सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, ” आपल्याला माहित आहे काही दिवसांपूर्वी ‘ॲक्सिडेंटल पीएम’ चित्रपट आला होता. तसाच या कसब्यातही मागच्या निवडणुकीत एक ‘ॲक्सिडेंटल आमदार’ तयार झाला. हा आमदार काम कमी आणि दंगे आणि नाटकच जास्त करतो. मला वाटते या आमदाराला जर रंगभूमीवर नेले असते तर त्याने ‘तो मी नव्हेच’ हे पात्र छान केले असते”, असे म्हणत फडणवीसांनी धंगेकरांवर निशाणा साधला.
त्यानंतर आता धंगेकरांनी पोर्शे अपघात प्रकरणाचा उल्लेख करत फडणवीस यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. धंगेकर म्हणाले,” ज्यावेळी निवडणूक हरत असल्याचे त्यांच्या किंवा पक्षाच्या लक्षात येते त्यावेळी ते जाती- पातीवर भाषण करतात. ते म्हणाले की, धंगेकर एकपात्री नाटक आहे. मी त्यांचे आभार मानतो, त्यांनी माझी सर्व नाटकं बघितली आहेत. जी नाटकं त्यांनी बघितली आहे, त्यामध्ये पोर्शे कार अपघातही बघितला आहे.
यामध्ये दोन मुलं मृत्यूमुखी पडली आणि यामध्ये पोलीस,
गृहखाते आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हे प्रकरण चुकीच्या मार्गाने कसे नेले हे पुणेकरांनी पाहिले आहे.
पण त्याच प्रकरणात मी लक्ष घातल्यानंतर एका केसचा दोनदा पंचनामा होतो हे आपण बघितले आहे
आणि दुसऱ्या पंचनाम्यात त्या लोकांना शिक्षा झाल्याचेही आपण बघितले आहे”,
असे म्हणत धंगेकरांनी फडणवीसांवरच टीकास्त्र सोडले आहे. (Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’