Pune Crime News | परिमंडळ 2 मधील रेकॉर्डवरील 158 गुन्हेगारांवर कारवाई वास्तव्यास ! कार्यक्रमात भाग घेण्यास मनाई, 6 गुंडांना केले तडीपार
पुणे : Pune Crime News | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिमंडळ २ च्या कार्यक्षेत्रातील तब्बल १५८ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी कारवाई केली आहे. त्यांना परिमंडळ २ च्या कार्यक्षेत्रातील सहकारनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ, लष्कर, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर ६ गुंडांना २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना परिमंडळ २ च्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास, वास्तव्य करण्यास तसेच कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्यास, मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास, सार्वजनिक रित्या वावरण्यास तसेच ज्यामुळे सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्यु करण्यास सक्त मनाई करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते जर कार्यक्षेत्रात आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil IPS) यांनी सांगितले. (Pune Police Action On Criminals)
परिमंडळ २ मधील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेले, त्यात जाळपोळ करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर हत्यार वापरणे, धमकी देणे, खंडणी, अपहरण, दंगा करणे, दरोडा तयारी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या रेकॉर्डवरील ६ गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार करण्यात आले आहे.
त्यात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील गुन्हेगार राज अमित गुंजी (वय २०, रा. कोरेगाव पार्क), बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष ऊर्फ भाव्या नितीन आडसुळ (वय २१, रा. ताडीवाला रोड), सुषमा भिमा विधाते (वय ३२, रा. ताडीवाला रोड) यांचा समावेश आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेजस महादेव खाटपे (वय १९, रा. कल्याण मोरगिरी,ता. हवेली, सध्या रा. आंबेगाव), तुषार दिलीप माने (वय २०, रा. आंबेगाव), अक्षय सुनिल येवले (वय २९, रा. आंबेगाव खुर्द) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
यापुढील काळातही रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार
असल्याचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’