Kothrud Assembly Election 2024 | गदिमा स्मारकाच्या कामाला गती देऊन खूप मोठं काम केलं; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचे कौतुकोद्गार

Ulhas Bapat - Chandrakant Patil

पुणे : Kothrud Assembly Election 2024 | गदिमा स्मारकाच्या कामाला गती देऊन चंद्रकांतदादांनी (Chandrakant Patil) खूप मोठं काम केलंय, असे कौतुकोद्गार प्रसिद्ध घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी काढले. यासोबतच, चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, विविध विषयांवर अनौपचारिक संवादही साधला.

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ घरोघरी संपर्काअंतर्गत उल्हास बापट यांची भेट घेऊन मतदानाचे आवाहन केले. यावेळी बापट यांनी कौतुकोद्गार काढले. यावेळी माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे या देखील उपस्थित होते.

या भेटीवेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर यांच्या माध्यमातून गदिमांच्या साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल सुरु असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला.
त्यावर उल्हास बापट म्हणाले की, दादा तुम्ही महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या गदिमा स्मारकाच्या कामाला गती देऊन खूप मोठं काम केलं आहे.
यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीस पाठबळ मिळाले आहे.

दरम्यान, महायुतीच्या प्रचारार्थ चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ मतदार लिलाताई म्हैसकर (वय १००),
निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले यांचीही भेट घेऊन आशीर्वाद घेतले. (Kothrud Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed