Pune Crime News | अपहरणानंतर ठेकेदाराचा तासाभरात निर्घुण खुन ! मृतदेहाचे तुकडे करुन खडकवासला बॅकवॉटरमध्ये फेकले, तिघांना अटक (Video)

Murder Case Of Contractor

पुणे : Pune Crime News | मॉर्निग वॉकला गेलेल्या विठ्ठल पोळेकर (Vitthal Polekar) यांना मामा चला, जरा तुमच्याकडे काम आहे, असे म्हणून त्यांना कारमध्ये बसविले आणि खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) बॅक वॉटरमधील ओसाडे गावाजवळ नेऊन त्यांचा खुन केला (Murder Case). अपहरण करुन (Kidnapping Case) चौघांनी त्यांचा तासाभरातच खुन केला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते खडकवासला बॅक वॉटरमधील (Khadakwasla Back Water) पाण्यात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Rural Police) आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DCeY9vOJCqp

विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०, रा. पोळेकरवाडी, डोणजे, ता. हवेली) असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देवीदास थोरात (वय २४, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि रोहित किसन भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामे हा फरार आहे. योगेश भामे याच्यावर शरीराविरुद्धचे ९ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे यांचा समावेश आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये आणि आता विधानसभा निवडणुकांची आचार संहिता लागल्यानंतर त्याच्यावर ११० नुसार कारवाई करण्यात येऊन बाँड घेण्यात आला होता, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh IPS) यांनी सांगितले.

विठ्ठल पोळेकर हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी पायगुडे वाडी ते गोळेवाडी रस्त्याचे कामाचा ठेका घेतला होता. या कामात कोणताही अडथळा करु नये, म्हणून योगेश भामे याने त्यांच्याकडे खंडणी म्हणून एक जॅग्वार कार मागितली होती. त्याची पुर्तता न केल्याने त्याने विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खुन करण्याची धमकी दिली होती. मॉर्निंग वॉकला गेलेले विठ्ठल पोळेकर हे परत न आल्याने अगोदर मिसिंग व त्यानंतर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोळेकर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पाहिल्यावर ते गेल्यानंतर त्यांच्या मागोमाग एक स्विफ्ट कार जाताना दिसली.

ती गणेश मुरलीधर चोरमले यांची असून सध्या योगेश भामे वापरत असल्याची माहिती मिळाली. योगेश भामे हा घरी नसल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने त्यानेच अपहरण केल्याचा संशय निर्माण झाला. त्याचा भाऊ रोहित भामे याला पोलिसांनी अटक केली. या कारचा शोध घेतला असता ती नाशिकच्या दिशेने गेली असून योगेश भामे हा गाडी चालवत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash Shilimkar) व त्यांचे सहकारी नाशिकला रवाना झाले. नाशिकमध्ये शोध घेतल्यावर संशयित आरोपी हे रेल्वेने जबलपूरकडे गेल्याचे समजले. जबलपूर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने शुभम व मिलिंद यांना पकडण्यात आले, असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, विठ्ठल पोळेकर यांचा शोध इकडे करण्यात येत होता. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (Addl SP Ramesh Chopade) यांनी सांगितले की, दोघांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना बॅक वॉटरला नेऊन मारण्यात आले व त्यांचे अवयव पाण्यात टाकण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरुन शोध सुरु केला. त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संभाषण करुन माहिती घेतली. ड्रॉनद्वारे व नावेतून त्यांचा शोध घेतल्यानंतर विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे काही अवयव पोलिसांना मिळाले आहेत. मात्र, शीर अद्याप मिळालेले नाही. अतिशय निर्घुणपणे त्यांचा खुन केल्याचे दिसून येत आहे.

खंडणी व्यतिरिक्त अन्य कारणाचा शोध

अपहरण केल्यानंतर तासाभरात त्यांचा खुन करण्यात आला. विठ्ठल पोळेकर यांचा ज्या निर्घुणपणे खुन करण्यात आला, ते पाहता खंडणीशिवाय आणखी काही कारणे त्यामागे आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

हॉटेलमधील कामगारांना घेतले हाताशी

योगेश भामे हा ग्रॉमपंचायत सदस्य असून त्याची पत्नी यापूर्वी सरपंच होती. त्यामुळे गावात येणार्‍यांवर तो छाप पाडत असे़ त्यातूनच त्याने डोणजे येथील पतंजली हॉटेलमध्ये काम करणार्‍या शुभम व मिलिंद यांना हाताशी धरले. शुभम सोनवणे याच्यावर खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे २ गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी (SDPO Sunilkumar Pujari) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे (PI Sachin Wangde), सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ (API Kuldeep Sankpal), दत्ताजीराव मोहिते (API Dattajirao MOhite), सहायक पोलीस निरीक्षक अमोल बामणे (API Amol Bamne), सागर पवार (API Sagar Pawar), पोलीस उपनिरीक्षक सुतनासे,

पोलीस अंमलदार हनुमंत पासलकर, महेश बनकर, रामदास बाबर, राजू मोमीण, अतुल डेरे, दिपक साबळे,
मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, तुषार भोईटे, मंगेश भगत, अमोल शेडगे,
काशिनाथ राजापुरे, दगडु वीरकर, संतोष भापकर, दिपक गायकवाड, संतोष तोडकर, गणेश धनवे, महेंद्र चौधरी,
सचिन गुंड यांनी केली आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप,
भगवान जाधव, रवींद्र दिघे, तसेच नाशिक आरपीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरपुल सिंग, अंमलदार दिनेश यादव,
सागर वर्मा, तसेच जबलपूर जी आर पी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरंजन गुजर,
अंमलदार अमर धुर्वे, यांनी मदत केली आहे.

तक्रारीची चौकशी करणार

विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election) सुरु असताना ठेकेदाराचे अपहरण झाल्याचे समोर येताच,
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी (Sunil Phulari IPS)
यांनी याबाबत तत्काळ तपासाचे आदेश दिले होते. त्यांनी घटनास्थळी भेट देखील दिली होती.
दरम्यान, ठेकेदाराचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा पोलिस तपास करत असल्याचे फुलारी
यांनी सांगितले. सुरुवातीला पोलिस ठाण्यात ठेकेदार बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed