Devendra Fadnavis On Sharad Pawar | “शरद पवार स्वतः जातीयवादी राजकारण करतात”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
नागपूर : Devendra Fadnavis On Sharad Pawar | नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदार संघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१७) रोड शो रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे (Praful Gudadhe) यांच्या भागात फडणवीस यांनी रोड शो करीत जनतेचे आशीर्वाद मागितले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार बोलण्यासाठी केवळ जातीयवादी नसल्याचे सांगतात, मात्र ते स्वतः त्याच पद्धतीचे राजकारण करतात, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Maharashtra Assembly Election 2024)
व्होट जिहादच्या (Vote Jihad) मुद्द्यावरून शरद पवार यांनी शनिवार (दि.१६) फडणवीस यांना लक्ष्य केले होते. पुण्यात विशिष्ट समाज विशिष्ट व्यक्तीला मतदान करतो तो ‘व्होट जिहाद’ नाही का? असे पवार यांनी म्हंटले होते. “व्होट जिहादसाठी नोमानी (Sajjad Nomani) सारख्या व्यक्तींच्या मागण्या मान्य करणारे महाविकास आघाडीचे नव्हे, तर महायुतीचेच सरकार राज्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामे व लोकोपयोगी योजनांमुळे जनतेत हा विश्वास दिसत आहे”, असे फडणवीस यांनी म्हंटले.
दक्षिण पश्चिम नागपूर विशेषता जयताळा परिसरात झालेल्या विकास कामांमुळे आज आमचे उत्स्फूर्त स्वागत पाहायला मिळाले. मी फारसा प्रचारात नसलो तरी हा माझा परिवार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करताना हिंदुत्वावर जे कोणी बोट ठेवतील त्यांचा आम्ही संघटीतपणे मुकाबला करणार, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. (Devendra Fadnavis On Sharad Pawar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’