Jayant Patil On Devendra Fadnavis | जयंत पाटील यांचा मोठा दावा; म्हणाले – “भाजपचं ठरलंय, शिंदे- अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री”
पुणे: Jayant Patil On Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर महायुती की महाविकास आघाडी गुलाल उधळणार हे निश्चित होणार आहे.मविआ आणि महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये अनेक नावे पुढे येत आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदावरून मोठं वक्तव्य केले आहे. “मला आता मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही, मी या रेसमध्ये नाही, असं देवेंद्र फडणवीस बोलत असले तरी भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांचा (Ajit Pawar) पत्ता कट करुन फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे हे ठरवले आहे”, असे भाष्य जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील म्हणाले, ” खरं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फोडताना देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यावेळी वरुन आदेश आला, तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचंय, हे सत्य आहे. अन्यथा, ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा कशातून आली”, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, ” अमित शहा यांनी तीनवेळा सांगितलं आहे की, पुढचं सरकार भाजपचं म्हणजे मुख्यमंत्री भाजपचा. देवेंद्रजी नेतृत्व करतील. अमित शहा ही गोष्ट बोलतात, याचा अर्थ हे मोदींनाही मान्य आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट करुन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं हे ठरलेलं आहे.
पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा करायला भाजपचे धाडस होत नाही. तसे केल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज होऊ शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काहीशी सॉफ्ट भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नाराज होण्याचा कोणताही हक्क नाही. कारण त्यांनी भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे की नाही, हे लहान पोरगंही सांगेल. राज्यात महायुतीची सत्ता येणार नाही. पण चुकून महायुती सत्तेत आली तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, सत्ता न आल्यास देवेंद्र फडणवीस हेच विरोधी पक्षनेते असतील”, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’