Bibvewadi Pune Crime News | 63 वर्षाच्या काकाला पुतणी, भावाने केली मारहाण ! पुतणीने विनयभंग केल्याची दिली तक्रार

Bibvewadi Police Station

पुणे : Bibvewadi Pune Crime News | दरवाजातून जाताना पुतणीने जाणीवपूर्वक धक्का दिला. त्याचा जाब विचारल्यावर दोन पुतण्या, वहिनी आणि भावाने ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे धाव घेतल्यावर या पुतणीने विनयभंगाची (Molestation Case) तक्रार दिली आहे. (Bibvewadi Pune Crime News)

याबाबत एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३५ व ४२ वर्षाच्या त्यांच्या पुतण्या, ६५ वर्षाची वहिनी आणि ७५ वर्षाच्या मोठ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील एका सोसायटीत रविवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावाची मुलगी हिने दरवाजात फिर्यादीस जाणीवपूर्वक जोरात धक्का दिला. त्याचा तिला जाब विचारल्यावर असता दोन्ही मुलींनी त्यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वहिनीने लाकडी दांडके या मुलीच्या हाती दिले. त्यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या पायावर मारहाण केली. मोठ्या भावाने शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Marhan)

याविरोधात पुतणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ६३ वर्षाच्या काकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे काका यांनी फिर्यादीचे राहते घरासमोर फिर्यादीस हाताने मारहाण केली. फिर्यादीने परिधान केलेला टी शर्ट जोरात ओढली. त्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. फिर्यादी हे ओरडले असता त्यांची बहिण तेथे आली. काकाने तिला ही मारहाण केली. यापूर्वीही काका अश्लिल हावभाव करुन फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वतन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार पारखे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed