Hadapsar Assembly Election 2024 | हडपसरच्या विकासासाठी प्रशांत जगताप यांना निवडून द्यावे; बाळासाहेब शिवरकर यांचे आवाहन
भव्य बाईक रॅली, विजयी निर्धार सभेने प्रशांत जगताप यांच्या प्रचाराची सांगता
हडपसर: Hadapsar Assembly Election 2024 | “महापौर म्हणून प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केलेले काम मी पाहिलेले आहे. त्यांच्यातील दूरदृष्टीपणा, विकासाचे नियोजन, नागरिकांच्या समस्यांची जाण, सर्वसामान्य माणसाशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २०) ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रशांत जगताप यांना आमदार म्हणून निवडून देऊया,” असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर (Balasaheb Shivarkar) यांनी केले.
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार (MVA Candidate) प्रशांत जगताप यांच्या प्रचाराची सांगता कात्रज ते मांजरी अशी भव्य बाईक रॅली व मांजरी येथील विजयी निर्धार सभेने झाली. सभेवेळी माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, वसंत मोरे, दिलीप आबा तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे, काँगेस कमिटीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख समीर तुपे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, “मागच्या पाच वर्षात विद्यमान आमदारांनी या भागाचे वाटोळे केले. कोणतेही विकासाचे काम केले नाही. घरी बसून राहणारा, नकाराचा पाढा वाचणारा आमदार नको आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या चेतन तुपे यांना घरी बसवण्याची ही वेळ आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे. या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याची माझी इच्छा आहे. हडपसर, मुंढवा, केशवनगर, मांजरी, कात्रज, कोंढवा या भागाचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर राहणार आहे. पाणीटंचाई, वाहतूक कोंडी दूर करायची आहे.”
या वेळी विविध पक्ष-संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशांत जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. योगेश ससाणे, वसंत मोरे, दिलीप आबा तुपे, समीर तुपे, प्रवीण तुपे यांचीही यावेळी भाषणे झाली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध