Excise Department Daund Pune Maharashtra | दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 10 लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त तर 2 लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल उद्धवस्त
पुणे : Excise Department Daund Pune Maharashtra | राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाच्या धडक कारवाईत एकूण १० लाख ६९ हजार ४१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त तसेच २ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल उद्धवस्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय रोकडे (Vijay Rokde Excise Inspector) यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) आदर्श आचारसंहिता कालावधीत पथकाच्यावतीने यवत पोलीस स्टेशनाच्या (Yavat Police Station) हद्दीतील मौजे हिंगणीगाडा, येथे अवैधरीत्या गावठी दारूचा साठा असल्याबाबत माहिती मिळताच छापा टाकून धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये गावठी हातभट्टी दारूचे ३५ लिटर क्षमतेचे एकूण ८० कॅन नष्ट करण्यात आले असून. एकूण २ लाख ९६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला आहे. दुसऱ्या कारवाईत अवैधरित्या देशी विदेशी मद्याची वाहतूक व विक्री करताना एका चारचाकी वाहनासह एकूण १० लाख ६९ हजार ४१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत निरीक्षक विजय रोकडे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, जवान नि. वाहन चालक केशव वामने, जवान अशोक पाटील, जवान संकेत वाजे, जवान सौरभ देवकर, जवान सागर दुबळे, जवान प्रवीण सूर्यवंशी सहभागी होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध