Ramesh Kadam News | “बाबा सिद्दिकी प्रमाणे हत्या करण्याचा डाव”, शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी, तिघांविरोधात गुन्हा दाखल
सोलापूर: Ramesh Kadam News | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) माजी आमदाराला धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण (Kidnapping Case) करून खंडणी मागण्याचा (Extortion Case) प्रयत्न सुरू असल्याची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. यासंदर्भात रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये, आपल्या जिवाला धोका असून बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे हत्या (Baba Siddique Murder) करण्याचा डाव असल्याचे कदम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
आता पोलिसांनी याप्रकरणी आबा काशीद, आकाश बाबर आणि धनराज भोसले या तिन्ही आरोपींविरोधात रिव्हॉल्वर दाखवून खंडणी मागणे, जीवे मारण्यासाठी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १४०(२), १४०(३), ६२, ३ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबतची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात आहे. रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीने सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले नामक युवकांना रिव्हॉल्वर, गाडी आणि पैसे दिल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान आकाश बाबर आणि धनराज भोसले या दोघांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर मुख्य आरोपी असलेल्या आबा काशीदचा शोध अद्याप सुरू आहे. आबा काशीदचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं मागावर आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध