Maharashtra Assembly Election 2024 | ‘तुमच्या मनासारखे होईल, बारामतीला भेटायला या’, एका विधानावर मतदारसंघाची सूत्रे फिरली; शरद पवारांनी टाकलेला एक डाव अन् विरोधकांना धक्का
सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल (दि.१८) सायंकाळी थांबला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलेली राजकीय खेळी अनेकांच्या लक्षात आली नाही. मात्र ते चित्र आज स्पष्ट झाले आहे. विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार यशवंत माने (Yashwant Mane) , तर राष्ट्रवादी शरद पवार पवार गटाकडून राजू खरे (Raju Khare) हे निवडणूक लढवत आहेत.
संजय क्षीरसागर हेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छूक होते. मात्र, त्यांना तिकिट मिळू शकले नव्हते, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. क्षीरसागर यांची उमेदवारी ही तुतारीच्या विजयात अडथळा ठरू शकते, हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी सूत्रे फिरवल्याचे पाहायला मिळाले.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोहोळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा दिला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडीचे सूत्रधार ज्येष्ठ नेते शरद पवार असल्याचे मंगळवारी सकाळीच स्पष्ट झाले.
माजी आमदार राजन पाटील यांना त्यांच्याच पिचवर चारीमुंड्या चीत करण्यासाठी शरद पवारांनी टाकलेला डाव अनेकांच्या लक्षातही आला नाही. मात्र, ‘तुमच्या मनासारखे होईल, बारामतीला भेटायला या’ या एकाच वाक्यावर क्षीरसागरांनी माघार घेतली आणि सकाळीच गोविंद बागेत जाऊन पवारांची भेट घेतली. त्या भेटीत क्षीरसागर यांच्या पदरात महामंडळाचे अध्यक्षपद आणि एक खासगी काम पूर्ण करण्याचा शब्द पडला आहे.
क्षीरसागर यांनी उमेदवारी मागे घेणे आवश्यक आहे. एव्हाना मतविभागणीची फायदा आमदार यशवंत माने
यांना होऊ शकतो, ही गोष्ट शरद पवार यांच्यापर्यंत पोचली होती.
त्यांनी सूत्रे हाती घेताच वेगवान घडामोडी घडल्या. खुद्द पवारांचा फोन गेला आणि संजय क्षीरसागर
यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांच्या कुरुल येथील प्रचाराच्या सांगता सभेच्या व्यासपीठावर हजेरी लावली आणि उपस्थितांना धक्का दिला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध