Baramati Assembly Election 2024 | बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, शर्मिला पवार पाठोपाठ अजित पवारही पोहोचले मतदान केंद्रावर

बारामती: Baramati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांचे पुत्र युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्व आहे. दरम्यान या मतदारसंघात नवनव्या राजकीय घडामोडी समोर येत आहेत.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात महात्मा गांधी बालक मंदिर या मतदान केंद्रावर दुपारी १:०० वाजताच्या सुमारास जोरदार बाचाबाची झाली. याप्रकरणी शर्मिला पवार (Sharmila Pawar) त्याठिकाणी पोहोचल्या, त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तेथे पोहोचल्याचे पाहायला मिळाले. शर्मिला पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर केलेले आरोप स्वताः अजित पवार यांनी फेटाळले. दरम्यान काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या मतदान केंद्रावर अजित पवार यांच्या चिन्हाच्या स्लीप मतदान केंद्रात नेल्या जात असून त्यांचे कार्यकर्ते बोट दाखवून एक क्रमांकाला मतदान करा असे मतदारांना सांगत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) कार्यकर्ते मोहसिन पठाण यांनी घेतला.
त्यांनी ही बाब शरयू फाउंडेशनच्या (Sharayu Foundation) प्रमुख शर्मिला पवार यांना कळविली. त्यानंतर काही मिनिटातच शर्मिला पवार घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी मतदान केंद्रातील अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना याबाबत जाब विचारला.
शर्मिला पवार म्हणाल्या, ” काही कार्यकर्त्यांकडून चुकीच्या पध्दतीने दमदाटी केली जात असून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, मतदानाच्या स्लीप वरील घडयाळाच्या चिठ्ठया दाखवून हे चुकीचे प्रकार सुरु आहेत. या संदर्भात आम्ही लेखी तक्रार करणार असून धमकी दिल्याप्रकरणीही तक्रार दाखल करणार आहे.”
अजित पवार म्हणाले, “शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे असून याबाबत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेतील, सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज ते तपासून कारवाई करतील. स्लीपबाबत केलेले आरोपही बिनबुडाचे आहेत, अशा स्लीप वर्षानुवर्षे वाटप करण्याची प्रथा आहे. माझ्या कार्यकर्त्याला मतदान केंद्रातून बाहेर काढणे हेही चुकीचेच होते, हा अधिकार त्यांना नसताना असे कृत्य योग्य नाही”, असे अजित पवार यांनी म्हंटले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध