Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis

पुणे: Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणुकीची मतदान मोजणी सुरु आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. मतदारांनी चित्रविचित्र आघाड्या, युती पाहिल्या. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा मतदार कोणाला निवडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्यातील सर्व २८८ जागांचे कल हाती आले असून सत्तेसाठी मॅजिक फिगर असलेली संख्या महायुतीने गाठल्याचं दिसून येत आहे.

महायुतीने २१६ जागांवर आघाडी घेतली असून महाविकास आघाडी ५२ जागांवर आघाडीवर आहे तर इतर २० जागांवर आघाडीवर आहेत. असेच कल राहिल्यास महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) १०० जागांपर्यंत पोहोचण्यासाठी दमछाक होत आहे.

ही निवडणूक अटीतटीची होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र हाती येत असलेल्या मतमोजणीनुसार तसे होताना दिसत नाही. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुती एकहाती सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे. सत्तेसाठी लागणारा १४५ चा आकडा महायुतीने पार केलेला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Punit Balan Studios – Raanti Movie | पुनीत बालन स्टुडिओज निर्मित अ‍ॅक्शनपॅक्ड ‘रानटी’ आज चित्रपटगृहात

Punit Balan Studios-Raanti Movie | चित्रपटगृहात ‘रानटी’चा धुमाकूळ ! सर्वच चित्रपटगृहांत प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल  प्रतिसाद

You may have missed