Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
मुंबई: Maharashtra Assembly Election Results | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. दुपारपर्यंत कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होणार आहे. हाती आलेल्या निकालानुसार महायुतीची सरशी पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व २८८ जागांचे कल हाती आले असून सत्तेसाठी मॅजिक फिगर असलेली संख्या महायुतीने गाठल्याचं दिसून येत आहे.
श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे, नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस, मावळ मतदारसंघातून सुनील शेळके , परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे-पाटील तर जामनेर मधून गिरीश महाजन विजयी झाले आहेत. ही निवडणूक अटीतटीची होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र हाती येत असलेल्या मतमोजणीनुसार तसे होतानाचे चित्र दिसत नाही.
यंदाची ही निवडणूक बऱ्याच पातळींवर महत्त्वाची ठरली. या निवडणुकीत पहिल्यांदाच विभाजित झालेली
शिवसेना म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले तर राष्ट्रवादी अजित पवार गट
आणि शरद पवार गट यांच्यातही लढत पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी या निवडणुकीत आपली सारी ताकद पणाला लावली,
कारण दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट