Shahaji Bapu Patil News | शिवसेना शिंदे गटाच्या 50 पैकी एकाचा पराभव; काय झाडी, काय डोंगर वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटील पराभूत

Shahaji Bapu Patil

सांगोला: Shahaji Bapu Patil News | विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. दरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपबरोबर, शिवसेना, राष्ट्रवादीची जोरदार कामगिरी पाहायला मिळत आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचा (Shivsena Shinde Group) एक शिलेदार पराभूत झाला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून शहाजीबापू पाटलांचा दारुण पराभव झाला आहे. या मतदारसंघातून शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr Babasaheb Deshmukh) २५,३८४ मताने विजयी झाले आहेत. (Sangola Assembly Election Results 2024)

माझ्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकजरी पडला तरी राजकारण सोडून निघून जाईन असे एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सांगोला विधानसभा मतदार संघांमध्ये पडलेली मते :

बाबासाहेब देशमुख – १,१६,२८०

शहाजीबापू पाटील – ०,९०,८९६

दीपकआबा साळुंखे – ०,५१,०००

शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed