Pune Congress News | पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या हाती भोपळा ! 25 वर्षानंतर भोरचा काँग्रेसचा गड पडला
पुणे : Pune Congress News | एके काळी काँग्रेसचा गड असे म्हटल्या गेलेल्या पुणे जिल्ह्यात या विधानसभा निवडणुकीत चक्क भोपळा हाती लागला आहे. आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) असे प्रथमच घडले आहे. त्याचबरोबर भोर हा गेली किमान २५ वर्षे काँग्रेसचा गड यंदा ढासळला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) Ajit Pawar NCP पक्षाचे शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांचा तब्बल १९ हजार ६३८ मतांनी पराभव केला आहे. संग्राम थोपटे हे २००९पासून भोरमधून (Bhor Assembly) सातत्याने निवडून येत होते. त्यांचा पराभव काँग्रेसला धक्का देऊन गेला आहे.
संग्राम यांचे वडिल अनंतराव थोपटे (Anantrao Thopte) हे काँग्रेसच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होती. राज्यात दुध महापूर योजना त्यांनी यशस्वीपणे राबविली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फाटाफुटीनंतर १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काशिनाथ खुटवड यांनी अनंतराव थोपटे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २००४ मध्ये अनंतराव थोपटे यांनी पुन्हा एकदा विजय मिळविला होता. असा हा काँग्रेसचा गड या निवडणुकीत ढासळला आहे.
पुरंदर (Purandar Assembly) हा पूर्वी दादा जाधवराव (Dada Jadhavrao) यांचा गड राहिला होता. २००९ मध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी तो आपल्याकडे खेचून घेतला होता. सलग दोनदा विजय मिळविल्यानंतर २०१९ मध्ये अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना कसा निवडून येतो, असे बोलून काँग्रेसच्या संजय जगताप यांच्या पारड्यात आपले वजन टाकले होते. त्यामुळे संजय जगताप हे निवडून आले होते. यंदा विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांना आसमान दाखविले.
कसबा विधानसभेच्या (Kasba Peth Assembly) पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवून पुणे शहरात काँग्रेसचे अस्तित्व जाणवून दिले होते. त्यामुळे शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला होता. लोकसभा निवडणुकीत कसबा पेठेने भाजपच्या मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या पारड्यात भरभरुन मते दिली होती. तेव्हाच विधानसभेचे चित्र स्पष्ट झाले होते. कसब्यातून हेमंत रासने (Hemant Rasane) विजयी झाले.
शिवाजीनगरमध्ये (Shivaji Nagar Assembly) काँग्रेसला यंदा संधी होती. परंतु, दत्ता बहिरट (Datta Bahirat)
यांना उमेदवारी दिल्याने मनिष आनंद (Manish Anand) यांनी बंडखोरी केली.
त्यामुळे भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्यासाठी ही लढाई सोपी झाली होती.
काँग्रेसच्या तीनही आमदारांना पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर जेथे संधी होती
तेथे बंडखोरी आणि विस्कळीत प्रचार यामुळे संधी हुकली. त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या हाती भोपळा मिळाला आहे.
राज्यातील विधानसभेत पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचा एकही आमदार नाही हे चित्र प्रथमच दिसणार आहे. (Pune Congress News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट