Maharashtra Assembly Election Results 2024 | ‘सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही’, शरद पवार गटाच्या नेत्याचे मोठं वक्तव्य
मुंबई : Maharashtra Assembly Election Results 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती (Mahavikas Aghadi Vs Mahayuti) यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत मविआला मोठा फटका बसला. यंदा शरद पवार (Sharad Pawar) यांचा करिष्मा चालू शकला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena Thackeray Group) २० तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या. कळवा मुंब्रा मतदारसंघातून (Mumbra-kalwa Assembly) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात नजीब मुल्ला (Najeeb Mulla) हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत नजीब मुल्ला यांचा १ लाख मतांनी पराभव झाला आहे.
विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ” सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला खूप दुःख होत आहे. संशयही आहे. सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही. मी पहिल्यादिवसापासून सांगतोय, कालही सांगत होतो आणि आजही सांगेन की, ईव्हीएम मशीनवर विश्वास ठेऊ नका”, असे आव्हाड यांनी म्हंटले आहे. (Maharashtra Assembly Election Results 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट