Pune Politics News | पुण्यातुन मंत्रिपदासाठी कोणाची वर्णी लागणार? मिसाळ, लांडगे, शेळके, कुल यांच्या नावांची चर्चा

Election Chair

पुणे : Pune Politics News | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर आता पुणे शहर, पिंपरी – चिंचवड, आणि जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. बारामती मतदारसंघातून अजित पवार, आंबेगावमधून निवडून आलेले दिलीप वळसे-पाटील, कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहे.

त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal), दौंडचे राहुल कुल (Rahul Kul), मावळचे सुनील शेळके (Sunil Shelke) आणि भोसरीचे महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या नावाची चर्चा राज्यमंत्रिपदासाठी आहे. विधानसभा निवडणुकीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये महायुतीचे १८ आमदार, तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आणि १ अपक्ष आमदार निवडून आले आहेत.

सलग आठव्यांदा निवडून येण्याचा मान अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांना मिळाला आहे.
त्यामुळे अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील हे मंत्री होणार आहेत.
भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील हे पुन्हा मंत्री होणार आहेत. त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ,
दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे
यांची राज्यमंत्रिपदासाठी वर्णी लागेल असे बोलले जात आहे. (Pune Politics News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed