Pune Crime News | पुण्याच्या भवानी पेठेतील व्यावसायिकाची आत्महत्या, जाणून घ्या कारण

Suicide

पुणे : Pune Crime News | पावसाळ्यात आलेल्या पुराने ताडीवाला रोड येथील गोदामात पाणी शिरुन मालाचे नुकसान झाले. याचे पैसे द्यावेत म्हणून व्यावसायिकाकडे देणेकरांनी लकडा लावला़ मुलाला उचलून नेण्याची धमकी दिली. या मानसिक त्रासामुळे एका व्यावसायिकाने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Businessman Suicide In Pune)

राजा परदेशी (वय ४४, रा. महाराष्ट्र तरुण मंडळा शेजारी, हरकानगर, काशेवाडी, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी कंचन राजा परदेशी (वय ३८, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी लक्कडसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काशेवाडी येथील घरात शनिवारी दुपारी १२ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा परदेशी यांचे ताडीवाला रोड येथे गोदाम होते. लक्कडसिंग हा त्यांना डुक्कर पुरविण्याचे काम करीत असे. परदेशी हे या डुक्करांचे मांस तयार करुन ताडीवाला रोड येथील गोदामात ठेवत असे. ग्राहकांच्या मागणी नुसार त्यांना पुरवठा करत असे. पावसाळ्यात त्यांच्या गोदामात पुराचे पाणी शिरले आणि सर्व माल खराब झाला.

जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान परदेशी भरुन काढू शकले नाही.
दुसरीकडे लक्कडसिंग हा त्यांच्याकडे तुझे नुकसान झाले त्याला मी काय करु, माझे पैसे दे, असे म्हणून पैशांची वारंवार मागणी करत होता.
तो शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत होता. मुलांना उचलून नेण्याची धमकी देत होता.
त्याच्या या मानसिक त्रासाला कंटाळून राजा परदेशी यांनी शनिवारी दुपारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed