Pune Crime Branch News | चोरट्याला पकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस ! गुन्हे शाखेच्या युनिट 4 ची कामगिरी
पुणे : Pune Crime Branch News | घरच्या कडेला थांबलेल्या चोरट्याला पकडून त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला यश आले आहे. मल्लिकार्जुन ऊर्फ मंजू साहेबराव पाटील (वय १९, रा. गंगोत्री अपार्टमेंट, सुखसागरनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्यांच्याकडून धानोरी (Dhanori) येथील घरफोडीसह दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Arrest In House Burglary)
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station) परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सहायक फौजदार प्रवीण राजपूत व पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना बातमी मिळाली की, धानोरी येथे घरफोडी केलेला आरोपी मुळा रोडवरील मासाहेब हॉटेलसमोर कोणाची तरी वाट पहात आहे. याबातमीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक तेथे गेले. तेथे थांबलेल्या मंजू पाटील याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याने धानोरी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून ५० हजार रुपये रोख व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. विश्रांतवाडी परिसरातील दोन गुन्हे उघडकीस आल्याने अधिक तपासासाठी त्याला विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingle DCP), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (Rajendra Mulik ACP)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Ajay Waghmare), पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम (PSI Vaibhav Magdum),
दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), सहायक फौजदार प्रविण राजपूत, यस्मीन सय्यद, पोलीस अंमलदार हरिष मोरे,
अजय गायकवाड, प्रविण भाचीम, विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी, विशाल गाडे, विनोद महाजन, एकनाथ जोशी,
नागेशसिंग कुंवर, जहांगिर पठाण, मनोज सांगळे, वैभव रणपिसे, देवीदास वाढंरे, राहुल परदेशी, सुभाष आव्हाड,
भरत गुंडवाड, विशाल ईथापे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, सहायक फौजदार शितल शिंदे यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट