Pune Crime News | अल्पवयीन असताना गर्भवती राहिल्याने जबरदस्तीने केला बालविवाह; त्रास देत असल्याने मुलीला घरी आणल्याने वडिलांवर कोयत्याने केले वार
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन असताना मुलगी गर्भवती राहिल्याने मुलगा व त्याच्या आईवडिलांनी जबरदस्तीने आपल्या मुलाबरोबर बाल विवाह लावला. त्यानंतर सासरी नांदत असताना मुलीला त्रास देत असल्याने वडिलांनी तिला घरी आणले. या रागातून जावयाने सासऱ्यावर कोयत्याने वार (Koyta Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत मुलीच्या ५८ वर्षाच्या वडिलांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन खडक पोलिसांनी मुलगा व त्याच्या आईवडिलांवर पोस्को (POCSO Act) तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये (Child Marriage Act) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑक्टोंबर २०२३ ते २२ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडली. (Attempt To Murder)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी अल्पवयीन असताना आरोपी मुलाने तिच्याबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला वेळोवेळी आपल्या घरी नेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. हे समजल्यावर त्यांनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीचा आपल्या मुलाबरोबर जबरदस्तीने बाल विवाह लावून दिला. मुलगी सासरी नांदत असताना तिला वेळोवेळी मानसिक व शारीरीक त्रास दिला.
हे समजल्यावर फिर्यादी आपल्या मुलीला घरी घेऊन आले.
याचा राग मनात ठेवून फिर्यादी हे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पान शॉपच्या पाठीमागे रिक्षा पार्क करीत
असताना जावयाने त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक हिरे तपास करीत आहेत. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट