Katraj Pune Accident News | भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने चालक तरुणाचा मृत्यु ! कात्रजमधील घटना, कर्वे रोडवरील घटनेत चालक गंभीर जखमी

Accident

पुणे : Katraj Pune Accident News | मध्यरात्री सुनसान रोडवर भरधाव जाताना थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी जीवाशी गाठ असते. पण, वेगाचे वेड पांघरलेल्या तरुणाईच्या डोक्यात ते शिरत नाही. अन एखाद्या अवघड क्षणी दुर्लक्ष होते आणि होत्याचे नव्हते घडते. असाच प्रकार पुण्यात एकाच रात्री दोन ठिकाणी झाला. भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने एका घटनेत चालकाचा मृत्यु झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

हर्षद दिपक बर्गे (वय २५, रा. मिलेटरी हौसिंग सोसायटी,सदर बाजार, सातारा) असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र ऋषिकेश हेमंत धोत्रे (वय २६, रा. देशमुख कॉलनी, सदर बाजार, सातारा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. हा अपघात कात्रजमधील मोरेबाग बसस्टॉपसमोर (Morebaug Bus Stop Katraj) शनिवारी पहाटे अडीच वाजता घडला.

फिर्यादी व त्यांचा मित्र हर्षद बर्गे हे मोटारसायकलवरुन जात होते. बर्गे याने भरधाव मोटारसायकल चालविताना मोरेबाग बसस्टॉपसमोरील दुभाजकाला धडक दिली. त्यात ते रस्तावर पडल्याने दोघे जखमी झाले. हर्षद बर्गे याचा मृत्यु झाला असून ऋषिकेश धोत्रे हा जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

दुसरी घटना कर्वे रोडवरील रांका ज्वेलर्ससमोरील उड्डाण पुलाच्या सुरुवातीला घडली. त्यात वैभव हनुमंत पिंपळे (वय ३५, रा. सरस्वती कॉलनी, शिवनगर, संभाजीनगर, सातारा) हा तरुण जखमी झाला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अमोल खारतोडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Karve Raod Pune Accident News)

वैभव पिंपळे हा शुक्रवारी रात्री अकरा वाजता भरधाव वेगाने कर्वे रोडवरुन जात होता.
नळस्टॉपजवळील उड्डाणपुल सुरु होत असताना पुलाच्या कठड्याला दुचाकीची जोरात धडक दिली.
त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगिता गायकवाड तपास करीत आहेत. (Katraj Pune Accident News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”,
संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed