Ulhas Bapat News | विधिमंडळातील विरोधी पक्ष नेत्याबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचे भाष्य; म्हणाले – ‘… आता हे उदारपणावर अवलंबून राहील’

मुंबई : Ulhas Bapat News | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election Results 2024) निकाल काल (दि.२३) जाहीर झाला. विधानसभेच्या या निकालातून महायुतीची मोठी लाट पाहायला मिळाली. महायुतीला मिळालेल्या २३० हुन अधिकच्या संख्याबळामुळे मविआला ४६ जागांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आता विधानपरिषदेत विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे.
उल्हास बापट म्हणाले, ” आताच जो निकाल आहे तो अनपेक्षित आहे. आताची आकडेवारी आणि संख्याबळ पाहता विरोधी पक्षनेतेपद मिळणं अशक्य वाटत आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेतेपद असणं गरजेचं असतं. विरोधी पक्षनेता हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे.
आकडे जुळत नसतील तरी स्पीकर आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेच्या हातात आहे.
त्यांना विरोधी पक्षनेते पद देता येते. आता हा उदारपणावर अवलंबून राहील.
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट हे ठरवू शकतील.
त्यांनी मोठं मन दाखवलं तर हे ते होऊ शकतं”, असे बापट यांनी म्हंटले आहे. (Ulhas Bapat News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट