Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारी असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत
पुणे : Katraj Pune Crime News | मोक्का प्रकरणात (MCOCA Act) न्यायालयाने २ वर्ष तडीपार केले असतानाही चुहा याने शहरात येऊन आपल्या टोळीला घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारी (Robbery Case) असलेल्या चुहा गँगच्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. (Chuha Gang Arrested)
तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय २९, रा. रघुनंदन अपार्टमेंट, धानोरी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसिडेन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जनाब (रा. कॅम्प) हा पळून गेला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथील डिलाईट बेकरीसमोर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
तौसिफ ऊर्फ चुहा याच्याविरुद्ध जातील दंगली, दरोडा, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला २०२० मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली होती. या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी ६ नोव्हेबर २०२३ पासून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते.
असे असतानाही या तडीपारीचा भंग करुन शहरात आला होता. कात्रज येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत
आपल्या साथीदारांसह तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरुन पोलिसांनी त्यांना घेरुन चौघांना पकडले. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल,
एक जिवंत काडतुस व मॅफेड्रॉन, कोयता, डिजिटल वजन काटा, सुतळी, स्क्रु ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने (Sr PI Sharad Zine), पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे (PSI Suresh Shinde), मोहन कळमकर (PSI Mohan Kalamkar) व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर अधिक तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mahayuti News | महायुतीच्या नेत्यांना आणखी एक लॉटरी, विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”,
संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट