Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
मुंबई : Rashmi Shukla आदर्श आचार संहिता मागे घेतल्याची घोषणा निवडणुक आयोगाने सोमवारी सायंकाळी करताच राज्य शासनाने तातडीने नवा आदेश काढून रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे घोषित केले. (DGP Maharashtra)
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आरोप असून त्या पोलीस महासंचालक असताना विधानसभा निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात होणार नाही. रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणुक आयोगाकडे केली होती़. त्यानंतर निवडणुक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार ५ नोव्हेबर रोजी शासनाने रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यांच्या जागी संजय कुमार (Sanjay Kumar Varma IPS) यांची नियुक्ती केली होती.
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळी निवडणुक आयोगाने आदर्श आचारसंहिता रद्द केल्याची घोषणा केली. त्या पाठोपाठ राज्य शासनाने एक आदेश काढून रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात येत असल्याचा जाहीर केले. रश्मी शुक्ला या मंगळवारी संजय कुमार वर्मा यांच्याकडून पुन्हा पदभार स्वीकारतील.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार