Maharashtra Politics News | एकीकडे फडणवीसांच्या करिष्म्याची ताकद, दुसरीकडे शिंदेंची नाराजीही ओढवायची नाही; मुख्यमंत्री पदावरुन महायुतीचं घोडं अडलं
मुंबई : Maharashtra Politics News | विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Results 2024) समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार की, मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. (Who Will Next CM Of Maharashtra)
मात्र मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना (Shivsena) आणि भाजपामध्ये (BJP) मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करावे यासाठी त्यांच्या समर्थकांकडून दबाव वाढला आहे. मात्र मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असावेत यासाठी अजित पवारांकडून पाठिंबा असल्याचे बोलले जातेय. अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) ४१ आमदार निवडून आले आहेत.
तसेच देवेंद्र फडणवीस यांना ५ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने भाजपाचे संख्याबळ १३७ वर पोहोचले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या करिष्म्याची ताकद भाजपा पक्षश्रेष्ठींना चांगली ठाऊक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदी फडणवीसांचे नाव आघाडीवर दिसतेय. तर दुसरीकडे यंदाची विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली. त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले.
यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हेच दावेदार आहेत, असा वाढता दबाव एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत असल्याचे दिसत आहे. आपल्या नेतृत्वातच महायुतीला भक्कम यश मिळाल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, असा एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. भाजपाला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना नाराज करायचे नाही. त्यामुळे आता भाजपा पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीने तोडगा काढतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. (Maharashtra Politics News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार