Chandan Nagar Pune Crime News | दुकानदारांकडून खंडणी उकळणार्‍या गुंडाला अटक; वर्षभर उकळत होता खंडणी, रक्कम दुप्पट केल्याने दिली तक्रार

khandani

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | दुकान चालू ठेवण्याकरीता गेल्या वर्षभराहून अधिक काळ दर रोज १०० रुपये खंडणी (Extortion Case) घेऊन जात असलेल्या गुंडाने आता ही रक्कम दुप्पट केली. त्यामुळे दुकानदाराने तक्रार दिली असून चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) एकाला अटक केली आहे.

जीवन गोविंद बनसोडे Jeevan Govind Bansode (वय २७, रा. श्रीराम सोसायटी, खराडी) असे या गुंडाचे नाव आहे. ही घटना जून २०२३ ते जून २०२४ दरम्यान वडगाव शेरी येथील इनवोरबीट मॉलजवळील (Inorbit Mall Vadgaon Sheri) शक्ती स्पोर्टससमोरील कार्तिक मोमोज या हातगाडीवर घडली. याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शक्ती स्पोर्टस समोर इन्वोरबीट मॉलसमोर कार्तिक मोमोज नावाने दुकान चालवित आहेत, जीवन बनसोडे याने दुकान चालू ठेवायचे असेल तर मला दररोज १०० रुपये प्रमाणे खंडणी देण्यास सांगितले. तेव्हा फिर्यादी हे घाबरुन दररोजी १०० रुपये प्रमाणे त्यांनी वेळवेळी ऑनलाईन व रोख स्वरुपात २५ हजार २०० रुपयांची खंडणी त्याला दिली आहे.

आता बनसोडे याने प्रत्येक दिवसाला १०० रुपये ऐवजी २०० रुपये खंडणी मांगितली. तेव्हा फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी जीवन बनसोडे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने (API Prashant Mane) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

You may have missed