Shivsena Thackeray Group News | महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार? संजय राऊत म्हणाले, “… निर्णय घ्यावा लागणार”

Sanajy Raut On Mahavikas Aghadi

मुंबई : Shivsena Thackeray Group News | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने ९५ जागा लढवल्या त्यातील २० जागा निवडून आल्या. त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये आता महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचा सूर दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा त्यांचा आग्रह आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. “पराभव होताच मविआमधून बाहेर पडण्याचा काही जणांनी सूर आळवला असला तरी ही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही”, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत म्हणाले, ” महाविकास आघाडीपासून वेगळी होणार नाही. निकाल लागल्यानंतर तीनही पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तीनही पक्ष आपापल्यापरिने निकालाचे विश्लेषण, चिंतन करत आहेत. या पराभवाची कारणे शोधण्याचे काम सुरू आहे. ही कारणे ईव्हीएमच्या दिशेने जात असून तीनही पक्षांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल.

पराभव झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांची निश्चित अशी भावना असते की आपण स्वबळावर लढायला हवे होते. पण आगामी काळात मुंबई मनपा आणि राज्यातील १४ महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे.”

ते पुढे म्हणाले, ” लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आणखी पाच वर्षांचा काळ उरला आहे.
आम्ही लोकसभेला मविआमधून निवडणूक लढलो, त्याचा आम्हाला फायदा झाला. हे विसरता येणार नाही.
पण दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीत यश मिळू शकले नाही, त्याची कारणे काय आहेत,
हे आम्ही येणाऱ्या काळात शोधू. शांतपणे भविष्याचा विचार केल्यास तीनही पक्ष एकत्र बसूनच निर्णय घेतील,
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आता तरी कोणताही विचार नाही”, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी